Sadabhau Khot On BJP | आयाराम-गयारामांचे लाड किती पुरवावे? सदाभाऊ खोत यांचा भाजपला सूचक इशारा

0

मुंबई: Sadabhau Khot On BJP | पुढील काही दिवसात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. अशातच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

गावाकडच्या नेतृत्व करणाऱ्या घटक पक्षांचे प्रतिबिंब मंत्रिमंडळात विस्तारात उमटलं पाहिजे आणि घटक पक्षांना सन्मान दिला पाहिजे, अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये नाराजीची भावना पसरेल, असं सूचक इशारा सदाभाऊ खोत यांनी भाजपाला दिला आहे.

घटक पक्षांना सन्मान दिला पाहिजे, अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये नाराजीची भावना पसरेल, तसेच आयाराम-गयारामांचे लाड किती पुरवावे, याला निर्बंध असणे गरजेचे आहे, असा सल्ला देखील सदाभाऊ खोत यांनी भाजपाला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.