Murlidhar Mohol | गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर मुरलीधर मोहोळांनी स्वीकारला राज्यमंत्रिपद पदभार; शरद पवारांच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला धक्का देण्याची तयारी? (Videos)

0

पुणे: Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार आणि नागरी उड्डान खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. आज मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. पदभार स्विकारण्याअगोदर मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली.

मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात येतंय. त्या माध्यमातून त्यांच्या मागे भाजप ताकद उभी करत असल्याची चर्चा पुण्यात दबक्या आवाजात सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत दादांना बसलेल्या धक्क्यांमुळे पुण्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे.

त्यामुळे दिल्लीतील भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला आणखी धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ यांना सहकार राज्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा म्हणून मोहोळ यांचे नेतृत्व उदयास आणले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना नागरी उड्डाण व सहकार खाते देण्यात आले. त्यामुळे पुण्यातील विमानतळ तसेच सहकार खात्याशी संबंधित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.