Chandrakant Patil On Vinod Tawade | ‘विनोद तावडे मोठे होतील, त्याचा आम्हाला आनंदच आहे’; चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

0

कोल्हापूर: Chandrakant Patil On Vinod Tawade | विनोद तावडे हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे जातील तिथे यश मिळवण्यासाठी सर्व बारकावे पाहतात. ते मोठे होतील आणि आम्हाला आनंद आहे. पक्ष चालवण्यामागे त्यांची मोठी भूमिका आहे. असे सूचक वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पाटील यांच्या हस्ते मंगळवारी शेंडा पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र त्यांना काय द्यायचे हे ठरवेल. याबाबत अनेक पर्याय चर्चेत येत आहेत असेही ते म्हणाले. (BJP New President)

आता जे पी नड्डा यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता पक्षाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा आहेत. त्यामध्ये मराठी चेहरा असलेल्या विनोद तावडेंची चर्चा सुरु आहे.

या कार्यक्रमात विविध प्रश्नांना उत्तर देताना पाटील म्हणाले, मोहन भागवत हे सर्वांचे पालक आहेत. घरामध्ये काहीही घडलं तर त्याच्यावर बोलण्याचा त्यांचा अधिकारच असतो. आम्ही नेहमीच आत्मपरीक्षण करतोच. त्यामुळे दोन जागांवरून आम्ही इथंपर्यंत आलो आहोत. पुणे लोकसभा क्षेत्रात उत्तम समूहकाम झालं आहे. आम्ही तेथे संविधान यात्राही काढली होती.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना वस्तुस्थिती सांगावी लागणार आहे. कांदा आणि मराठा आरक्षण याबाबत आम्ही जे काही केलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो. अमित शहा यांच्या सुचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा कामाला सुरूवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.