Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अग्रवाल दांपत्यासह आरोपी मकानदारच्या पोलीस कोठडीत 14 जून पर्यंत वाढ; मकानदारला दिलेल्या 4 लाखांपैकी 3 लाख जप्त

0

पुणे : – Kalyani Nagar Car Accident Pune | पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident Pune) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Vishal Agarwal Builder), आई शिवानी अगरवाल (Shivani Agarwal) आणि अश्फाक मकानदार (Ashfaq Basha Makandar) यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू.एम. मुधोळकर (Judge U M Mudholkar) यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत 14 जूनपर्यंत वाढ केली आहे.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांनी न्यायालयात सांगितले, गुन्ह्यात वापरलेले पुरावे गोळा करण्यात आले आहेत. विशाल अगरवाल याने मकानदार याला चार लाख रुपये दिले होते. त्यापैकी तीन लाख जप्त केले असून आणखी एक लाख रुपये जप्त करणे बाकी आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे तांत्रिक विश्लेषण करुन नवी पुरावे गोळा करायचे आहेत.

अग्रवाल दाम्पत्याने हात जोडले

न्यायालयात हजर केल्यानंतर शिवानी आणि विशाल यांनी सांगितले की, आम्हाला न्यायालयीन कोठडी मिळावी ही विनंती. अनेक दिवस पोलीस कोठडी झाली आहे. आता आम्हाला न्यायालयीन कोठडी (एमसीआर) मिळावी. या वेळी दोघेजण हात जोडून उभे होते. न्यायाधीशांनी शिवानी यांना एमसीआर म्हणजे काय माहिती आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर शिवानी यांनी न्यायालयीन कोठडी असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.