Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या तरुण खासदारांना संधी; मोहोळ यांनी कुटुंबियांसह घेतली फडणवीसांची भेट

0

पुणे: Murlidhar Mohol | आज नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधीला महाराष्ट्रातील सहा खासदारांची नावे समोर आली आहेत. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे.

पुण्यातून खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला होता. महापौर ते खासदार असा प्रवास करणारे मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात जाणार आहेत. यानिमित्ताने मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबियांसह देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भेट घेतली.

यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रातील खासदारांचे कौतुक करत प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ आणि खडसे यांच्यासारख्या तरुण खासदारांना संधी देण्यात आली. महाराष्ट्रात अनुभवी लोकांना मंत्री होण्याची संधी मिळाली आहे असे त्यांनी सांगितले.

पुणे खासदारपदासाठी भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांची नावे चर्चेत होती. परंतु मोहोळ यांचे काम पाहता त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यांनी संधी साधून अखेर खासदारपदी विराजमान होण्याचा मान मिळवला. मुरलीधर मोहोळ यांना पहिल्यांदाच खासदारपद मिळाले आहे. अशातच त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळातून मंत्रिपदाची ऑफर आल्याने पुणेकरांकडून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळहे कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. त्यांनी आरएसएस मधून सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. कोरोनाच्या महामारीत मोहोळ हे पुण्याच्या महापौर पदावर विराजमान झाले होते. त्यांनी त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम केले आहे. तेव्हापासूनच पुणे शहरात त्यांची प्रतिष्ठा वाढली होती.

मोहोळ यांचा राजकीय प्रवास

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक…
  • गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता…
  • बूथ प्रमुख म्हणून भाजपामध्ये कामाला सुरुवात…
  • युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदाचीही संधी…
  • संघटनेत ३० वर्षे कार्यरत…
  • सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रातही योगदान…
  • २००२, २००७ आणि २०१७ साली कोथरुडमधून नगरसेवक
  • २०१७ : साली स्थायी समिती धुरा…
  • २०१९ : पुण्याच्या महापौरपदीसंधी…
  • कोरोना काळात विविध पातळ्यांवर ैभरीव काम
  • २०२० : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी…
  • २०२२ : सरचिटणीस, महाराष्ट्र भाजपा
  • २०२२ : पश्चिम महाराष्ट्राची भाजपाची जबाबदारी
  • ४ जून, २०२४ : खासदार, पुणे
Leave A Reply

Your email address will not be published.