Hadapsar Pune Crime News | पुणे : ऊसतोड कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण, तीन तासात पाच आरोपींना हडपसर पोलिसांकडून अटक

0

पुणे :- Hadapsar Pune Crime News | ऊसतोड कामगार पुरवणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण (Kidnapping Case) केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल केला. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वा पाच वजण्याच्या सुमारास हडपसर येथील मंत्री मार्केट (Mantri Market Hadapsar) परिसरात घडली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी अवघ्या तीन तासात पाच आरोपींना अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

राजेंद्र चव्हाण असे अपहरण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मिथुन किसन राठोड (रा शिवनगरी, कॉलनी,मांजरी बु., हडपसर), विक्रम लालु जाधव (रा. आनंवाडी तांडा, ता. मदनसुरी ता. निलंगा जि. लातुर), अजित व्यंकट पाटील, अंकुश धोंडीराम मोहिते (दोघे रा. मु. मुदगडे एकोजी पो. कोकळगाव ता. निलंगा), ज्ञानोबा बळीराम वाघमारे (रा. पंचतारा नगर, आकुर्डी, मुळ रा. मुपो कोरा ता. उमरगा जि. धाराशिव) यांच्यावर 367, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत सुरेखा राजेंद्र चव्हाण (वय-37 रा. गवळीवस्ती, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा चव्हाण यांचे पती राजेंद्र चव्हाण ठेकेदार आहेत. ते शेतकऱ्यांना ऊसतोड कामगार पुरवितात. बप्पा याने राजेंद्र यांना ऊसतोड कामगार पुरविण्यासाठी तीन लाख रुपये दिले होते. मात्र, राजेंद्र यांनी ऊसतोड कामगार पुरवले नाहीत. त्यामुळे आरोपी राजेंद्र यांच्यावर चिडले होते. हडपसर भागातील मंत्री मार्केट परिसरातून राजेंद्र यांना मारहाण करुन आरोपींनी धमकावले. त्यांनी चारचाकी गाडीत घालून आरोपी पसार झाले. आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले.

घटनेचे गांभीर्य ओळखून तपास पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजवरुन स्कॉरपीओ एमएच 01 एसी 0078 या गाडीचा नंबर मिळवला. तसेच अपहरण केलेल्या व्यक्तीला गाडीत मारहाण करुन उचलून डांबून ठेवल्याचे दिसून आले. पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता गाडी यवतच्या पुढे गेल्याचे दिसून आले. आरोपींना इंदापूर टोल नाका येथे पकडण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार इंदापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.

दरम्यान, आरोपी पुणे-सोलापूर हायवे वर असलेल्या हॉटेल लिलाज रेस्टॉरंट अँड बार येथे बसल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना मिळाली. ही माहिती इंदापूर पोलिसांना देऊन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, जोतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, रामदास जाधव, सचिन गोरखे, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, इंदापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस अंमलदार प्रकाश माने, प्रविण शिंगाडे, नंदु जाधव यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.