Ajit Pawar NCP | अजितदादांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही? तटकरेंच्या निवासस्थानी बैठकीसाठी फडणवीस तातडीने दाखल

0

मुंबई: Ajit Pawar NCP | राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद मिळणार नसल्याची सध्या चर्चा सुरू आहे. यासंदर्भात सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkare) निवासस्थानी नुकतीच बैठक पार पडली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

दरम्यान काही वेळापूर्वी मंत्रिपदासाठी अद्याप फोन आला नसल्याची माहिती प्रफुल्ल पटेलांनी माध्यमांशी बोलताना दिली. यानंतर फडणवीस तटकरेंच्या घरी पोहोचले असल्याने राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.

प्रफुल पटेल यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर होते. त्यांना फोन येईल अशी अपेक्षा होती, परंतु दुपारी १२ पर्यंत पटेलांना फोन आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही, असे स्पष्ट होत आहे. दरम्यान फडणवीस , पटेल , तटकरे यांची बैठक सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.