Warje Malwadi Pune Crime News | पुणे : भाड्याने फ्लॅट घेण्याचे आमिष दाखवून तोतया आर्मी अधिकाऱ्याने घातला साडेपाच लाखांचा गंडा

0

पुणे : – Warje Malwadi Pune Crime News | आर्मी अधिकारी (Army Officer) असल्याचे सांगत भुगाव (Bhugaon) परिसरात फ्लॅट भाड्याने पाहिजे असल्याचे सांगत 32 वर्षीय व्यक्तीला 5 लाख 55 हजार 980 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी युवकाने वारजे माळवाडी पोलिसांना (Warje Malwadi Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा (Cheating Fraud Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 फेब्रुवारी ते 7 जून 2024 या कालावधीत घडला.

हर्षल गणपत मोरे (वय-32 रा. इशान सृष्टी, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दोन मोबाईल धारकांवर आयपीसी 170, 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षल मोरे यांच्या मोबाइलवर अनोळखी मोबाइल क्रमांकावरून (79061XXXXX, 78530XXXXX) फोन आला. यावेळी समोरील व्यक्तीने स्वत:ला आर्मीचा अधिकारी असल्याचे सांगत भुगाव येथे फ्लॅट भाड्याने पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर समोरील व्यक्तीने हर्षल मोरे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भामट्याने मोरे यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांच्या खात्यावरून 5 लाख 55 हजार 980 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.

चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने फसवणूक

वानवडी : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करुन त्यामधून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Good Returns) एका 42 वर्षीय व्यक्तीची 19 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 16 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन घडला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर (Cyber Thieves) फसवणूक आणि आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक करणकोट करीत आहेत. (Wanwadi Police Station)

प्रशिक्षण देऊन 14 लाखांचा गंडा

कोथरुड : फेसबुकला लिंक पाठवून स्टॉकचे प्रशिक्षण देवून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करुन घेतले. त्यानंतर झोकसा अॅप डाऊनलोड करण्यास सांगून स्टॉक्स लेआऊट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगून 13 लाख 75 हजार 896 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 12 जानेवारी ते 7 जून 2024 या कालावधीत घडला आहे. याबाबत 42 वर्षीय व्यक्तीने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे कदम करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.