Gold Prices Dip | चीनमधून आली बातमी…आणि सोन्याचा भाव कोसळला! गुंतवणूक केल्यास होऊ शकते नुकसान, जाणून घ्या…कारण

0

नवी दिल्ली : Gold Prices Dip | सोने आणि चांदीच्या दरात मागील काही काळापासून कायम तेजी दिसून आली. यामुळे दोन्ही धातू वाढून लाईफ टाइम हायवर पोहचले. विकसनशील देशांच्या केंद्रीय बँकांकडून सोन्याची विक्रमी खरेदी हे किमतीत आलेल्या तेजीचे कारण सांगण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी (७ जून) सोन्याच्या किमतीत राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे २ टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. घसरणीचे कारण चीनच्या केंद्रीय बँकेकडून (China Central Bank) सोन्याची खरेदी बंद करणे मानले जात आहे.

शुक्रवारी अंतरराष्ट्रीय बाजारात हाजीर सोन्याचा भाव १.८% घसरून २,३३३.६९ डॉलर प्रती औंसवर आला. इतकेच नव्हे तर सोन्याने या आठवड्यात आलेली तेजी, बाजार बंद होता-होता गमावली. सोने आतापर्यंत या आठवड्यात केवळ ०.३% वर आहे.

चीनने मे मध्ये सोन्याची खरेदी केली नाही. सोन्याचा भाव अंतरराष्ट्रीय बाजारात २० मे रोजी रेकॉर्ड हाय २,४४९.८९ प्रती औंसवर पोहचला होता.

भारतीय सराफा बाजरात सोन्याचा दर २१ मे रोजी ७४२२२ रुपयांच्या ऑल टाईम हायवर पोहचला. तसेच चांदीचा भाव २९ मे रोजी ९४२८० रुपये प्रती किलो ऑल टाईम हाय होता. शुक्रवारी बंद झालेल्या व्यवहाराच्या आठवड्यात सोने घसरून ७१९१३ रुपये प्रती १० ग्रॅम आणि चांदी ९०५३५ रुपये प्रती किलोवर बंद झाली. चीनमधून आलेल्या बातमीचा परिणाम भारतीय बाजारात सुद्धा दिसून आला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,‍ या बातमीचा परिणाम अजूनही बाजारात कायम राहील आणि सोने सोमवारी आणखी खाली जाऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.