Manoj Jarange Patil | मनोज जरांगे उपोषणावर ठाम, अंतरवाली सराटीत पोलिसांचा बंदोबस्त

0

बीड: Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही उद्यापासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Maratha Reservation Andolan)

“आम्ही परवानगी मागणारच नव्हतो मात्र अंबडचे तहसीलदार यांनी स्वतः भेट घेऊन सांगितले की ८ जूनच्या उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि एस.पी. यांना द्या. आता तेच प्रशासनातील लोक परवानगी नाकारत आहेत. म्हणजे सरकारला जाणून-बुजून हे करायचे होते.

परवानगी नाकारून अंतरवालीत बसलेल्या समाज बांधवांवर गृहमंत्र्यांना पुन्हा लाठी हल्ला करायचा आहे. माता माऊलींचे डोके फोडण्याचा सरकारचा, गृहमंत्र्यांचा डाव दिसतोय’, असा आरोप जरांगे यांनी केला.

जरांगे म्हणाले की, “शनिवारी सकाळी १० वाजता उपोषणाला सुरुवात होणार असून परवानगी दिली अथवा नाकारली तरी उपोषण होणार आहे. आम्हाला परवानगीची आवश्यकता नाही. हे आंदोलन २९ ऑगस्टपासून सुरू आहे.

मध्यंतरी सरकारने आश्वासन दिले म्हणून आंदोलन स्थगित केले होते. स्थगित केलेल्या आंदोलनाला पुन्हा परवानगीची आवश्यकता नसते. हे सरकार विसरते आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.