Pune PMC News | पावसाळ्यात महापालिका क्षेत्रिय कार्यालयात तीनही पाळ्यात कर्मचारी तैनात ! महापालिका आयुक्तांच्या आदेनुसार क्षेत्रिय कार्यालय स्तरावर पथकांची निर्मिती

0

पुणे : Pune PMC News | पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील चेंबर्सच्या जाळ्यांमध्ये कचरा अडकून पाणी अडले जाउ नये यासाठी चेंबर्सच्या जाळ्या तातडीने स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांमध्ये सकाळ, दुपार आणि रात्रपाळीमध्ये कर्मचारी नियुक्तीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या ड्युटीसाठी नेमलेले कर्मचारी आणि ठिकाणांची नावांची यादी तयार करून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाकडे त्यांचे मोबाईल नंबर्स देण्यात येणार आहेत.

शहरात नुकतेच झालेल्या वळीवाच्या पावसात अनेक रस्त्यांवर पाणी साठले होते. पाण्यासोबत वाहून येणार्‍या कचर्‍यामुळे पावसाळी गटारांच्या चेंबर्सच्या झाकणांमधून पाणी वाहून जाण्यास अडथळे येत येत असल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठते अशा ठिकाणच्या चेंबर्सच्या सिमेंटच्या जाळ्या बदलून त्याठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत ७५ हून अधिक चेंबर्सला लोखंडी जाळ्या बसविण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

पाउस सुरू असताना रस्त्यावरील चेंबर्सच्या झाकणांमध्ये रस्त्यावरील कचरा, पाला पाचोळा अडकतो. पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने रस्त्यावर पाणी साठते. अनेकदा काही सुजाण नागरिक चेंबर्सवरील कचरा काढून पाण्याला वाट काढून देण्याचा प्रयत्न करतात. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्तांनी प्रथमच अशा कामांसाठी पावसाळ्याच्या काळात तीनही पाळ्यांमध्ये कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये महापालिकेच्या पंधराही क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत कनिष्ठ अभियंता आणि आरोग्य निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली पंधरा कर्मचार्‍यांची टीम स्थापन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिले. यासोबतच प्रत्येक क्षेत्रिय कार्यालय स्तरावर चोवीस तास सुरु राहील असा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, यासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांकही देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.