Sassoon Hospital | ‘आयुर्वेदिक डॉक्टर चालवताेय ससून’? अधिष्ठात्यांना मदत करण्याच्या नावाखाली नियुक्ती

0

पुणे: Sassoon Hospital | दिवसेंदिवस ससून रुग्णालयातील गलथान कारभार समोर येत आहे. अगोदर ड्रग्स प्रकरणातील आरोपीला मदत करणे असो किंवा आता कल्याणीनगर अपघात प्रकरणात रक्त नमुने बदलणे असो ,असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. मागेच एका रुग्णाला उंदराने कुरतडल्याचे प्रकरणही ताजेच आहे.

आता ससून सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार एका बीएएमएस असलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरकडून चालवित जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ते मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मतदारसंघातील असल्याचे सांगण्यात येते.

मिळालेल्या माहितीनुसार, डीनच्या कार्यालयात डॉ. मानसिंग साबळे (Dr Mansing Sable) नावाचे एक डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत. वास्तविक याची गरज नाही. कारण डीन कार्यालयात इतर चार अधिकारीही आहेत. मात्र, डॉ. मानसिंग साबळे हेच जणू रुग्णालय चालवित आहेत, असे म्हंटले जाते.

ही नियुक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाली होती. डीनवरील कामाचा भार कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. ते गरीब रुग्णांना मार्गदर्शन करतात.

महाजनांच्या मतदारसंघातील कंत्राटी पध्दतीने नियुक्ती असलेल्या डॉ. साबळे यांची नियुक्ती राज्याचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाने केली होती.

मात्र, गिरीश महाजन यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) डॉ. रमेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही त्यांना फारसे ओळखत नाही. ते मंत्री महाजन यांच्या मतदारसंघातील आहेत, त्यापलीकडे त्यांच्याशी संबंध नाही.

त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही मंत्र्याचे नाव किंवा प्रभाव वापरू नये. कारण आमच्यासाठी सर्वजण समान आहेत. त्यांची नियुक्ती गिरीश महाजन यांच्या कार्यकाळात झाली नव्हती, त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, असेही डॉ. नाईक यांनी सांगितले.

साबळे यांच्याकडून काही रुग्णांना रेफर केलं जात असून त्याला विशेष वागणूक दिली जाते. तसेच साबळे स्वतःच्या स्वाक्षरीने प्रकरणे सामाजिक कार्य विभाग आणि अगदी आरएमओकडे पाठवत असल्याचीही माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.