Pune Crime News | पुणे : जागा मालकाची ई.एच. रियालिटी एल.एल.पी या बांधकाम कंपनीच्या भागीदरांकडून दोन कोटींची फसवणूक

0

पुणे :- Pune Crime News | गृहप्रकल्प विकसित करण्यासाठी विकसन करारनामा व कुलमुखत्यापत्र रजिस्टर करुन दिले. मात्र, त्याचा गैरवापर करुन जागा मालकाची दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ई.एच. रियालिटी , एल.एल.पी या बांधकाम कंपनीच्या (EH Reality LLP Company) भागीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 16 डिसेंबर 2022 ते 6 जून 2024 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी प्रविण मणिलाल संघवी (वय-58 रा. टिंबर मार्केट, भवानी पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ई.एच. रियालिटी , एल.एल.पी या बांधकाम कंपनीच्या भागीदारांवर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीची वाघोली (Wagholi) येथे जागा आहे. त्यापैकी काही जागा द ट्रिनिटी हा गृहप्रकल्प उभारण्यासाठी फिर्य़ादी यांनी दिली होती. जगा विकसनासाठी देताना विकसनकरारनामा व कुलमुखत्यारपत्र हे रजिस्टर करुन घेतले होते. यामध्ये फ्लॅट विक्री करण्यापूर्वी जागामालक यांना कळवणे तसेच रजिस्टर कागदपत्र करताना दोन्ही बाजुचा एक सभासद असणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. मात्र, आरोपींनी फ्लॅटची परस्पर विक्री केली.

जागा मालक व विकसक यांचे एक्सक्रो अकाउंट काढून ठरल्याप्रमाणे त्यामध्ये पैसे जमा करण्याचे ठरले होते. मात्र आरोपींनी फिर्यादी यांचे अकाउंट काढले नाही. तसेच फेज-1 चे काम पूर्ण झाले नसताना फेज-2 चे काम करण्याचे ठरले नसताना आरोपींनी फिर्य़ादी यांची जमीन बजाज फायनान्सकडे तारण ठेवून 35 कोटी रुपये कर्ज घेऊन अटी व शर्तींचा भंग केला. करारनामा करताना ठरल्याप्रमाणे ट्रिनिटी या गृहप्रकल्पातील फ्लॅट विक्रीची कल्पना फिर्य़ादी यांना दिली नाही. तसेच ग्राहकांकडून बुकिंग करण्यासाठी ठरलेल्य रक्कमेपेक्षा जास्त पैसे घेऊन पैशांचा अपहार करुन दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.