Chandan Nagar Pune Crime News | पुणे : घरात छुपा कॅमेरा लावून पत्नीचे शूटिंग, धमकावणाऱ्या पतीचे बिंग फुटले

0

पुणे : – Chandan Nagar Pune Crime News | घरात हिडन कॅमेरा लावून (Spy Camera In Home) पतीने पत्नीचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला घराची साफसफाई करीत असताना हॉलमध्ये टिव्हीच्या खाली असणाऱ्या टेबलच्यावर हिडन कॅमेरा लावल्याचे आढळून आले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 जानेवारी ते 24 एप्रिल 2024 या कालावधीत चंदननगर परिसरात घडला आहे.

याबाबत यमुनानगर, निगडी (Yamuna Nagar Nigdi) येथे राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी त्रिपुरा येथे राहणाऱ्या 34 वर्षीय पतीविरोधात आयपीसी 354(क), 504, 506 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिली आणि आरोपी हे दोघे पती-पत्नी आहेत. फिर्यादी घराची साफ सफाई करत असताना त्यांना हॉलमध्ये टीव्ही च्या खाली असणाऱ्या टेबलच्यावर हिडन कॅमेरा लावल्याचे दिसून आले. फिर्यादी यांनी याबाबत आईला फोन करुन सांगितले. कॅमेऱ्याचे बारकाईने निरीक्षण केले असता खालच्या बाजुला एक मेमरी कार्ड दिसले. फिर्यादी यांनी ते कार्ड मोबाईलमध्ये टाकून पाहिले असता, त्यांना घरात एकांतवासात असतानाचे चित्रीकरण मिळून आले.

दरम्यान, पती वारंवार व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आधारावर, माझ्याजवळ तुझ्या अशा काही गुप्त गोष्टी आहेत की, मी जर त्या उघड केल्या तर तुला तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही, असे धमकावत होता. ज्यावेळा हा कॅमेरा फिर्यादी यांच्या हाती लागला तेव्हा त्यांना पती आपल्याला सतत का धमकावतो हे समजले. काही दिवसांनी आरोपी पती घराची चावी तयार करण्यासाठी एका व्यक्तीला घरी घेऊन आला. त्यावेळी फिर्यादी यांनी विरोध केला असता त्यांच्यात वाद झाला. तसेच घराचा दरवाजा उघडला नाही. त्यावेळी देखील आरोपी पतीने ‘मी तुला बघुन घेतो. तुझा सर्व गुप्त डाटा माझ्याकडे आहे, तु घरात काय करते मला माहिती आहे, मी ते सर्व सोशल मीडीयावर व्हायरल करीन’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रेजीतवाड करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.