ACB Trap On DDR | 6 लाख रुपये लाच स्वीकारताना जिल्हा उपनिबंधक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

0

अकोला : – ACB Trap On DDR | प्राथमिक चौकशीचा अहवाल (कसुरी अहवाल) तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी 9 लाखांची लाच मागून सहा लाख रुपये लाच स्वीकारताना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम (District Deputy Registrar Washim) यांना अकोला एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.6) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथे करण्यात आली. (Bribe Case DDR Washim)

जिल्हा उपनिबंधक वर्ग -1 सहकारी संस्था वाशिम दिग्विजय हेमनाथ राठोड Digvijay Hemnath Rathod (वय 54 रा. साई विहार रेसिडेन्सी पाषाण सुस रोड, पुणे ह. मु. फ्लॅट नंबर 506, सिल्वर अपार्टमेंट तिरुपती सिटी, वाशिम) असे लाच घेताना पकडलेल्या क्लास वन अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मंगरुळपीर येथे राहणाऱ्या 46 वर्षीय व्यक्तीने अकोला एसीबीकडे तक्रार दिली आहे. (Washim ACB Trap)

तक्रारदार यांचे विरुद्ध सुरु असलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी राठोड यांनी 9 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदार यांनी त्यामधील 2 लाख 50 हजार रुपये अगोदरच दिले होते. उर्वरित राहिलेल्या पैशासाठी राठोड याने तगादा लावला होता. याबाबत तक्रारदार यांनी 4 जून रोजी अकोला येथील अँन्टी करप्शन ब्युरो येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी (दि.6) पडताळणी कारवाई केली. यावेळी आरोपी राठोड यांनी तडजोडीअंती तक्रारदार यांना सहा लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सिल्व्हर अपार्टमेंट मध्ये त्याच्या राहण्याच्या ठिकाणी सापळा रचला व राठोड याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. एसीबीने त्यांना ताब्यात घेऊन वाशिम शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत, नरेंद्र खैरनार पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, अभय, बावस्कर, संदीप ताले, निलेश शेगोकार यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.