Shrirang Barne | बारणेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळा पडणार?; आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

0

पिंपरी-चिंचवड: Shrirang Barne | केंद्रात एनडीए सत्तास्थापन (NDA Govt) करणार याबाबत आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. संसदीय पक्षाच्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला एनडीएच्या १३ घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

राज्यात भाजपाला (BJP) म्हणावे असे यश मिळाले नाही मात्र एनडीए म्हणून भाजपा देशात सत्तास्थापन करीत आहे. दरम्यान एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रीपदे मिळणार असण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहराला अनेकदा या पदाने हुलकावणी दिलेली आहे.

केंद्रात मंत्री पदासाठी आता श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो. दरम्यान बारणेंना संधी मिळाली तर पिंपरी चिंचवडचा (Pimpri Chinchwad) बॅकलॉग भरून निघणार आहे. सर्व पक्षीयांशी बारणे यांचे सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे ते यावेळी केंद्रात मंत्रिपदाचे दावेदार असतील असे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.