Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | एकनाथ शिंदेंचे पाच ते सहा आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; राजकीय भूकंप होणार?

0

मुंबई: Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Election Results 2024) राजकीय घडामोडींचा वेग आल्याचे चित्र आहे. दिल्लीत एनडीए कडून (NDA) सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे गटाचे काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. (Shivsena MLA)

याअगोदर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवार गटातील काही नेते संपर्कात असल्याचे भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मिळालेले यश पाहता शिंदे गटाचे काही नेते परतण्याच्या मार्गावर आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पाच ते सहा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

जे आमदार संपर्कात आहेत यासंदर्भात उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार असून, त्यांच्या निर्णयानंतरच त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल,अशी माहिती मिळत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय हादरे जाणवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवारांचे (Ajit Pawar) आमदार संपर्कात असल्याची माहिती दिल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदारही ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.