Mumbai Powai News | पवईत अतिक्रमण कारवाईदरम्यान जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, अनेक पोलीस कर्मचारी जखमी; परिसरात तणाव (Video)

0

मुंबई : – Mumbai Powai News | मुंबईतील पवई येथे भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना जमावाकडून बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पवईच्या जय भीम नगर येथे अतिक्रमण विरोधी कारवाई आज (गुरुवार) सकाळी साडेदहा वाजल्यापासून पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या बंदोबस्तात करण्यात येत होती. पालिकेच्या एस विभागाकडून या भागात यापूर्वी तोडक कारवाईची नोटीस दिली होती. पालिकेच्या नोटीसनंतरही अतिक्रमण झालेल्या जागेतील बांधकाम हटवलं न गेल्याने पालिका आणि पोलीस यांनी आज याठिकाणी तोडक कारवाईला सुरुवात केली. पालिकेच्या या कारवाईला स्थानिकांकडून तिव्र विरोध करण्यात आला. कारवाई सुरु असताना मोठा जमाव त्याठिकाणी जमल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं.

पोलिसांची एक टीम कारवाईवेळी उपस्थित होती. मात्र, जमावानं कारवाईला विरोध करुन अचानक पालिका कर्मचारी व पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात काही पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.