Rahul Gandhi | लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद राहुल गांधींकडे ?

0

दिल्ली: Rahul Gandhi | भारतीय जनता पक्ष बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे केंद्रात आता ‘मोदी सरकार’ (Modi Govt) दिसणार नाही. मित्रपक्षांच्या मदतीने भाजपने ‘एनडीए सरकार’ (NDA Govt) चालवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. एनडीए ने सरकार स्थापन केल्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींचा चेहरा असणार का? अशीही चर्चा केली जात आहे.

त्यातच राहुल गांधींनी लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारावी. सदनात पक्षाचे नेतृत्त्व करावे अशी मागणी काँग्रेसमधून जोर धरु लागली आहे. काँग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी ट्विट करुन ही मागणी जाहीरपणे केली आहे.

लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी १० टक्के जागा असाव्या लागतात. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ आहे. नव्या लोकसभेत काँग्रेसचे ९९ खासदार असतील. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने उत्तम कामगिरी केली. त्यांच्या २३२ जागा निवडून आल्या. इंडिया आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नव्या लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल असे म्हंटले जातेय.

Leave A Reply

Your email address will not be published.