Narendra Modi | नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा औपचारिक राजीनामा

0

दिल्ली: Narendra Modi | लोकसभा निवडणूकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे आता सरकार स्थापण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. परंतू नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला एकट्याला बहुमताचा २७२ हा जादुई आकडा काही पार करता आला नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी नरेंद्र मोदींना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मदतीची आवश्यकता आहे.

आज नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत, तेथे त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी तयारीला लागतील असे म्हटले जात आहे. राष्ट्रपती सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला बहुमत स्थापन करण्यासाठी बोलावतील त्यानंतर बुहमत चाचणी घेतली जाईल असे म्हटले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत आहे.

लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो, परंतु पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात. आता मंत्रिमंडळाने लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असून, राष्ट्रपतींच्या मान्यतेने १७ वी लोकसभा विसर्जित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.