Eknath Shinde On Devendra Fadnavis | फडणवीसांच्या राजीनाम्याच्या भाष्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “महायुतीला कमी जागा मिळण्याचं कारण …”

0

मुंबई: Eknath Shinde On Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Election Results 2024) उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सरकरमधून बाहेर पडणार आहेत. राज्यात महायुतीला आलेले अपयश पाहता पुर्णवेळ संघटनेचे काम करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी त्यांनी पक्ष श्रेष्टींकडे केल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असून केंद्रीय नेतृत्वाने आपल्यावर उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून बाजूला करावे. आपल्याला संघटनेसाठी काम करायचे आहे, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या भुमिकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एका निवडणुकीत सर्व काही संपत नसतं. एका निवडणुकीत हार-जीत झाली म्हणून आम्ही खचून जाणारे नाही आहोत. त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. पण टीम म्हणून आम्ही एकत्र काम करत राहणार”, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

ते म्हणाले , “महायुतीला कमी जागा मिळण्याचं कारण सर्वांना माहिती आहे. संविधान बदलणार, आरक्षण काढणार, अशी दिशाभूल करुन, एक अपप्रचार करुन, या ठिकाणी मिळवलेली मतं आहेत. त्यामध्ये विरोधकांना काही प्रमाणात यश मिळालं. या विरोधकांची खरे चेहरे जनतेला दिसतील. मूळ मतदार त्यांच्यापासून दुरावले आहेत. त्यांना दोन – दोन लाखांचा लीड मिळायला हवं होतं. पण ते मिळालं नाही. काही काळानंतर ज्यांचा संभ्रम झालाय, तो संभ्रम दूर होईल आणि यांचा खरा चेहरा दिसेल”, असं शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.