पुणे: Blood Sample Tampering Case Pune | कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी (Kalyani Nagar Porsche Car Accident Pune) नवे खुलासे समोर येत आहेत. ससून रुग्णालयात संबंधित प्रकरणातील आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना पोलिसांनी मागेच अटक केली होती.
ब्लड रिपोर्ट फेरफार करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांनी तीन लाख रुपये दिले होते. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) मुंबईतून (Mumbai) या दोघांना अटक केली होती.
आता या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातील कोठडी आज संपणार आहे. ५ जून पर्यंत अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात ठेवण्यात आले होते.
आज पुन्हा अल्पवयीन आरोपीची बाल सुधार गृहातील कोठडी वाढवून मागण्यात येणार आहे. पुणे पोलीस बाल न्याय मंडळासमोर Juvenile Justice Board (JJB) अल्पवयीन आरोपीची कस्टडी वाढवून मागणार आहेत.