Supriya Sule-Amol Kolhe | राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर

0

पुणे: Supriya Sule-Amol Kolhe | गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दरम्यान निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर लागल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारामती (Baramati Lok Sabha) आणि शिरूर (Shirur Lok Sabha) मधील दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. त्यापूर्वीच पुण्यातील राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयासमोर सकाळपासूनच बारामतीच्या सुप्रिया सुळे आणि शिरूरचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनंदनाचा भला मोठा फलक लावला होता. त्यामुळे सकाळपासूनच या फलकाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. तसेच चॅनल्सवर देखील हा फलक झळकला. (Pune NCP Office)

या फलकाविषयी कार्यालयासमोरील कार्यकर्त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, हा फलक रात्रीच लावण्यात आला आहे. कारण त्यांना या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार असल्याची खात्री होती.”

Leave A Reply

Your email address will not be published.