Sharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 10 पैकी 10 जागांवर आघाडी, लीड टिकणार का?

पुणे: Sharad Pawar NCP | राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षातही फूट पाहायला मिळाली. नेमकी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांनी फारकत घेत महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काय होणार? याबाबत विविध तर्क लावण्यात येत होते.

यावेळी शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये १० जागांवर निवडणूक लढवली होती, त्या दहाही जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. अजित पवारांनी फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमानं पक्ष बांधणी केली. ११ वाजेपर्यंतच्या कल पाहिल्यास १० जागांवरील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. लीड टिकणार का हे पहावे लागणार आहे.

भिवंडी

भिवंडीमध्ये राज्यमंत्री कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. बाळ्यामामा म्हात्रे यांनी मोठी आघाडी घेतली आहे

वर्धा
वर्ध्यामधून 11 वाजेपर्यंत अमर काळे आघाडीवर आहेत.

अहमदनगर दक्षिण –
भाजपचे सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. निलेश लंके यांनी 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

दिंडोरी –
चौथी फेरीअखेर भास्कर भगरे 6989 मतांनी पुढे आहेत. मंत्री भारती पवार पिछाडीवर आहेत.

माढा
भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

रावेर
रावेरमधून राष्ट्रवादी एस पी श्रीराम पाटील यांनी दहा वाजेपर्यंत आघाडी घेतली होती. रावेरमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

शिरुर
पाचव्या फेरी अखेर शिरुरमधुन अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांनी 25088 मतांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.

बीड
बजरंग सोनवणे यांनी तब्बल 8 हजार मतांची आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीनंतर पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जातोय.

सातारा
सातऱ्यात शशिकांत शिंदेंनी मोठी आघाडी घेतली आहे. उदयनराजे भोसले यांना मोठा झटका बसला आहे.

बारामती

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागले होते. कारण, पवार घरण्यातील दोन उमेदवार मैदानात होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या. सुरुवातीला सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली. चौथ्या फेरीनंतर सुप्रिया सुळे यांनी तब्बल 19 हजार मतांची आघाडी घेतली आहे.