Traffic Jam On Mumbai Pune Expressway | सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी ; लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

0

लोणावळा: Traffic Jam On Mumbai Pune Expressway | उन्हाळी सुट्टी संपत आल्याने अनेक पर्यटक लोणावळ्यात (Tourists In Lonavala) दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन पूल (Pune Amrutanjan Bridge) ते खोपोली (Khopoli) बाह्यवळण परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

उन्हाळी सुट्टीमुळे मुंबई-पुणे, तसेच राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळा, खंडाळा परिसरात दाखल होत आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. कार्ला लेणी, लोहगड ,खंडाळा राजमाची पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण परिसरात पर्यटक गर्दी करत आहेत.

मुंबईतील पर्यटक सहकुटुंब मोटारीतून लोणावळ्यात दाखल होत आहेत. त्यामुळे आज सकाळपासून द्रुतगती मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. घाट क्षेत्रात वाहनांचा वेग संथ झाल्याने कोंडीत भर पडली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिसांनी खंडाळा बोगद्याजवळ सर्व वाहने थांबविली.

मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सहा मार्गिका खुल्या करून देण्यात आल्या. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबईकडे जाणारी अवजड वाहने लोणावळा बाह्यवळण परिसरात थांबविण्यात आली आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.