Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : गुंतवणुकीच्या बहाण्याने 89 लाखांचा गंडा, बँकांचीही फसवणूक; 2 सीए वकीलासह 14 जणांवर गुन्हा दाखल, 5 जणांना अटक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Good Returns) तरुणाची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. तसेच बँकांमधून 80 लाख 72 हजार 502 रुपयांचे गृहकर्ज (Home Loan) घेऊन ते बुडीत करुन बँकांची देखील फसवणूक केली. याप्रकरणी दोन सीए, वकील यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करुन यातील पाच जणांना अटक केली आहे. हा प्रकार बावधन येथील हॉटेल ला-बाली (La Bali Hotel Bavdhan) , हॉटेल पिंगारा तसेच तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील दुय्यम निबंधक कार्यालय मावळ-2 येथे सप्टेंबर 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत घडला आहे.

याबाबत अजिंक्य जगदीश पाटील (वय- 24 रा. सेनापती बापट रस्ता, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. 31) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली. वासूदत्त भारत डुबे (वय 34 रा. बावधन), चंद्रकांत मोरे (वय 28, रा. खुर्द फुलंब्री, संभाजीनगर), प्रकाश बळीराम थोरात (वय 40, रा. बल्लूर दुर्ग, परभणी), कृतिका पोलावर (वय 32, रा. बावधन), विनोद अण्णा शिंदे (वय 25 रा. पिंपरी राजा, संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह सीए सागर कोकाटे (माजीवाडा, ठाणे), सीए नितीन चंद्राणी (वय 35, कोंढवा), वसीम जिलानी शेख (वय 35, रा. नेरुळ), ॲड. विष्णूदास चंडेल (वय 32, रा. मालेवाडी, परभणी), टेक्सास कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचा प्रमुख अनिल क्षत्रिय (लोढा सुप्रमस 2, वागळे इस्टेट, ठाणे), मधुसुदन टेक्सास कंपनीचे (रा. वागळे इस्टेट, ठाणे), बँकेचा प्रतिनिधी उत्तम शेळके (वय 35, नऱ्हे, पुणे), दीपक सखाराम जंगम (वय 29, रा. वाघोली, पुणे), विजय साहेबराव शिंदे (रा. पिंपरी राजा, संभाजीनगर) यांच्या विरोधात 406, 419, 420, 465, 467, 468, 471, 120(ब), 34 नुसार गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वासूदत्त डुबे याने फिर्यादी अजिंक्य पाटील यांना एक कोटी रुपये गुंतवणुकीच्या बदल्यात एक महिन्यात एक कोटी 75 हजार रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर 90 लाख रुपये देण्यास भाग पाडले. यातील फिर्यादी अजिंक्य यांना 50 हजार रुपये रक्कम देऊन उर्वरित 89 लाख 50 हजार रुपये स्वत:च्या फायद्याकरीता वापरून फिर्यादी अजिंक्य यांची फसवणूक केली.

दरम्यान, आरोपी विनोद शिंदे, दीपक जंगम आणि विजय शिंदे यांनी पूर्वनियोजित कट रचून अशिक्षित व अल्पशिक्षित व्यक्तींना ते उच्चशिक्षित असल्याचे भासवले. लिस्टेट कंपनीत नोकरी करत असल्याचे बनावट कागदपत्रे तयार केली. बनावट सॅलरी स्लीप बनवल्या. सॅलरी स्लीपच्या आधारावर अॅक्सीस बँकेतून 16 लाख 97 हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या हिंजवडी शाखेत एकूण तीन होम लोनद्वारे एकत्रित 80 लाख 72 हजार 502 रुपये कर्ज मंजूर करुन घेतले.

आरोपींनी बँकेतून होन लोन मंजूर करुन घेताना बाजारभावापेक्षा जास्त मूल्यांकन किंमत रक्कम मंजूर करवून घेतली. कर्ज खाते बुडित करुन बँकांची देखील फसवणूक करत असल्याने आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सपकळ करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.