Shaniwar Wada Pune Crime News | पुणे : शनिवारवाड्यात बॉम्बची अफवा, पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या बीडमधील तरुणावर गुन्हा दाखल

0

पुणे : – Shaniwar Wada Pune Crime News | शनिवारी सकाळी शनिवार वाड्याच्या पुढच्या गेट येथे बॉम्ब ठेवल्याची माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण (Pune Police Control Room) कक्षाला मिळाली. पोलिसांनी शनिवारवाडा परिसर रिकामा करुन बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून (BDDS) तपासणी करण्यात आली. त्यावेळी ही अफवा असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी बीडमधील एका तरुणाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

रामहरी अश्रू सातपुते Ramhari Ashru Satpute (रा. चिंचपूर, ता. आष्टी, जि. बीड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई राकेश बाळासाहेब गायकवाड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आयपीसी 501/1/ब, 506/2, 182 नुसार गुन्हा दाखल आहे. सातपुतेने शनिवारी (1 जून) पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी केला. शनिवारवाड्यातील प्रवेशद्वारात बॉम्ब ठेवला असल्याची खोटी माहिती त्याने नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बॉम्बशोधक पथकाने पाहणी केली. तेव्हा बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास केला. तपासात सातपुते याने दूरध्वनी करून शनिवार वाड्याच्या पुढच्या गेट जवळ बॉम्ब ठेवला आहे, मदत हवी आहे असे मैत्रिणीने सांगितल्याचे त्याने सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासात ही अफवा असल्याचे समोर आले. आरोपीने खोटा फोन करुन सरकारी यंत्रणेस वेठी धरुन, जाणीवपूर्वक खोटी माहिती देवून लोकांच्या मनात भिती निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.