Kondhwa Pune Crime News | पुणे : लग्न कर, नाही तर ‘ते’ व्हिडीओ व्हायरल करेन! तरुणावर गुन्हा दाखल

3rd June 2024

पुणे : – Kondhwa Pune Crime News | लग्न कर, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली (Threat Pornographic Videos Viral) . तसेच आरोपीचा नंबर ब्लॉक केल्यानंतर महिलेचे व्हि़डीओ व फोटो तिच्या नातेवाईक व सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) तेलंगणा येथील एका तरुणावर आयटी अॅक्ट सह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 26 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.2 जून) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन जॉनी जिलानी शेख Johnny Jilani Shaikh (वय-26 रा. वंटीमिंटा ता. जि. कडप्पा, तेलंगणा) याच्यावर आयपीसी 354(ड), 506, 427 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते 1 जून 2024 या दरम्यान घडला आहे. (Molestation Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईलवर ओळख वाढवली. आरोपी याने फिर्यादी महिलेसोबत प्रेम संबंध असताना एम.जी. रोड येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावून अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर व्हॅाट्सॲपवर मेसेज करून माझ्याशी लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेन, तुझे अश्लील फोटो व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली.

फिर्य़ादी यांना तिच्या आईच्या घरी बोलावून घेऊन फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन आणि तुमची रिक्षा जाळून टाकेन अशी धमकी दिली. तसेच रिक्षाची काच फोडून नुकसान केले. महिलेने आरोपीचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यानंतर त्याने त्याच्या मोबाईल मधील अश्लील फोटो फेसबुक व फिर्यादीच्या गावाकडील नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.