Sanjog Waghere On Maval Lok Sabha | ‘पार्थच्या पराभवाची माझ्या मनात चीड’; 1 लाख 72 हजारांच्या मताधिक्याने जिंकणार – संजोग वाघेरे

0

मावळ: Sanjog Waghere On Maval Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही तास उरलेले आहेत. मात्र उमेदवारांकडून आपणच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी जिंकण्याचा दावा केला आहे.

पिंपरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आज पुन्हा एकदा संजोग वाघेरे यांनी १ लाख ७२ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. २०१९ ला अजित पवारांचे (Ajit Pawar) सुपुत्र पार्थ पवार (Parth Ajit Pawar) यांचा बारणे यांनी पराभव केला होता. त्यावेळी मी शहराध्यक्ष होतो. यामुळे त्यांच्या पराभवाची चीड माझ्या मनात निश्चितच असल्याचे मत देखील वाघेरे यांनी व्यक्त केल आहे.

संजोग वाघेरे म्हणाले, लोकसभा निवडणूक हा एक वेगळा अनुभव आहे. एवढी मोठी निवडणूक ही माझ्या जीवनात पहिलीच आहे. पुढे ते म्हणाले, २०१४ पासून लोकसभा लढवायची हे ठरवलं होत. माझे काही मित्र खासदार आणि आमदार झाले, मलाही वाटलं आपणही व्हावं. पुढे ते म्हणाले, मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्यावर महाविकास आघाडीचा विजय होईल असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले,” दोन्ही वेळेस पक्षाचा आदेश असल्याने थांबलो. अखेर शिवसेना ठाकरे गटाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मतदारसंघातून मोठा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. विरोधकांनी गद्दारी केली हे लोकांना पटलं नाही. अजित पवारांनी मला ठाकरे गटात पार्थचा बदला घेण्यासाठी पाठवले नाही. तसे अजित पवार यांच्याशी बोलणं झालं नाही. पण, २०१९ ला राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष होतो.

ज्या उमेदवाराचे आपण काम केले. त्याला निवडून आणता आले नाही. याची चीड निश्चित आहे. एक्झिट पोलवर ते म्हणाले, बारणे जिंकतील हा जर तर चा प्रश्न आहे. उद्या कळेल कोण जिंकेल. मला विश्वास आहे महाविकास आघाडी जिंकेल.”

Leave A Reply

Your email address will not be published.