PMC Action On Unauthorized Construction In Kharadi | अनधिकृत बांधकामावर बुलडोझर; खराडीत पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाची कारवाई

0

पुणे: PMC Action On Unauthorized Construction In Kharadi | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) बांधकाम विभागाकडून अनधिकृत बांधकामावर करण्यात येणारी कारवाई लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) आचारसंहितेमुळे थंडावली होती. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे लावण्यात आली होती. त्यामुळे ही कारवाई थंडावली होती. त्यानंतर आता पुन्हा ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामावर सातत्याने कारवाई करण्यात येते. त्याच कारवाईचा भाग म्हणून खराडीतील सर्व्हे क्रमांक ३ ,पाटील बुवानगर भागात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेली इमारत अक्षय भोसुरे आणि इतर यांच्या नावे असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली. या कारवाईमध्ये बेकायदा बांधकाम पाडण्यात येऊन १५ हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

पुढे अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. ही कारवाई अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता राजेंद्र फुंदे, मंगेश गायकवाड, आरेखक योगेश गुरव, टूलिप इंजिनिअर गिरीश कराळे यांच्या पथकाने जॉ कटर, दोन जेसीबी, तीन ब्रेकर, एक गॅस कटर व दहा बिगारींच्या साहाय्याने ही कारवाई केली. या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

“बांधकाम विभागाकडून शहरातील अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात येतात. त्यावर बांधकाम विभागाने किती नोटिसांवर कारवाई केली? किती कारवाया बाकी आहेत, याचा आढावा महापालिकेच्या सर्वसाधारण समितीमध्ये घेतला जाणार आहे. त्यातून नोटिसांबाबतची माहिती समोर येईल”, असे डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.