Haveli Pune Crime News | पुणे : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये नाचवल्या मुली, पैसे मागताच बेदम मारहाण

3rd June 2024

पुणे : – Haveli Pune Crime News | हवेली तालुक्यातील कुडजे (Kudje Pune) गावातील एका फार्म हाऊसवर वाढदिवसाच्या पार्टीचे (Birthday Party In Farm House) आयोजन करण्यात आले होत. या पार्टीत आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी डान्सर मुलींना (Dancer Girl) बोलवण्यात आले होते. डान्स झाल्यानंतर मुलींनी पैशांची मागणी केली असता त्यांना दगडाने मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.1) रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान घडला आहे.

याबाबत 25 वर्षीय मुलीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींवर 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन रणदिवे याच्या मित्राचा वाढदिवस असल्याने केतन याने कुडजे गावातील एका फार्म हाऊसवर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत डान्स करण्यासाठी फिर्यादी यांच्यासह इतर दोघांना बोलवले होते.

पार्टीत फिर्यादी व त्यांच्या इतर दोन साथीदारांनी डान्स केल्यानंतर कामाचे पैसे मागितले. त्यावेळी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. याचा जाब विचारल्याने फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोन डान्सर यांना आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. फिर्य़ादी व त्यांचे सहकारी तेथून पळून जात असताना आरोपींनी फिर्यादी मुलीला दगड मारला. दगड डोक्यात बसल्याने फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली. तसेच तुम्ही कसे पळून जाता हे बघतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा करीत आहेत.