Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण ! दोघांचा जीव घेणाऱ्या पोर्शे कारची नोंदणी RTO रद्द करणार

0

पुणे : – Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या कार अपघातामुळे (Kalyani Nagar Accident) राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Builder) यांच्या मुलाने ताशी 166 च्या स्पीडने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुणांना विनाकारण जीव गमवावा लागला.

या अपघातानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदल्याचे समोर आले. या प्रकरणात आता आणखी एक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जणांचा जीव घेणाऱ्या पोर्शे कारची बंगळुरू आणि पुण्यातील नोंदणी रद्द करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (Pune RTO Office) घेतला आहे.

या प्रकरणातील आरोपी 17 वर्ष 8 महिने वयाचा असून, अपघातावेळी तोच कार चालवत होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. नोंदणी क्रमांक मिळण्यापूर्वीच ही कार सुमारे 166 किलोमीटर चालवली असल्याचे आरटीओच्या तपासणीत आढळून आले. विशेष म्हणजे या कारचा वापर आरोपी अल्पवयीनच करत असल्याचे सिद्ध झाले आहे.

अपघातग्रस्त पोर्शे कारची पुण्यातील नोंदणी प्रक्रिया रद्द केली आहे. बंगळुरु आरटीओने देखील त्या कारची तात्पुरती नोंदणी रद्द करावी, असे पत्र पुणे आरटीओ कडून पाठवण्यात आले आहे. या कारने दुचाकीला धडक दिली, तेव्हा तिचा वेग ताशी 166 किलोमीटर असल्याचे दिसून आले. याबाबत पोर्शे कंपनीच्या नऊ सदस्यांच्या पथकाने सोमवारी तपासणी केली असून, त्याचा अहवाल त्यांनी पोलिसांकडे सोपवला आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.

गाडीचा वेग पाहून प्रत्यक्षदर्शींचाही थरकाप

विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिली. यावेळी त्या गाडीचा वेग इतका होता कि डोळ्याची पापणी मिटेपर्यंत पोर्शे कार समोरुन पास झाली. दुचाकीला धडक दिल्यानंतर तरुणी अक्षरश: 15 फूट उंच उडून खाली पडली. तर तरुण लांब फेकला गेला. काही क्षणात दोघांचा जीव गेला. ही घटना पाहून प्रत्यक्षदर्शींचाही थरकाप उडाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.