Sangamwadi Road Pune Crime News | पुणे : ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करणाऱ्याला जाब विचारणे पडले महागात, तरुणाच्या मानेवर कटरने वार

0

पुणे : – Sangamwadi Road Pune Crime News | एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत असल्याचे बघून दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाने गुंडाला हटकले. याचा राग आल्याने आरोपीने धारदार कटरने तरुणाच्या मानेवर वार (Stabbing Case) करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर जाताना ‘मला असे पण जेलमध्येच जायचे आहे’ असे म्हणून आरोपी तेथून पळून गेला. हा प्रकार बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास सादलबाबा चौकातील (Sadal Baba Chowk) संगमवाडी रस्त्यावर घडला.

याबाबत किरण विजय डोंगरे (वय-21 रा. वाघोली, गोरे वस्ती वाघेश्वर नगर, वाघोली) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध आयपीसी 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची रिक्षा संगमवाडी येथे दुरुस्तीसाठी दिली होती. रिक्षा घेण्यासाठी फिर्य़ादी डोंगरे त्यांच्या मित्रासोबत दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी संगमवाडी रस्त्यावर एका ज्येष्ठ नागरिकाला एकजण मारहाण करत होता.

ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्यांच्याकडील पैसे जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न आरोपी करत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी दुचाकी थांबवून मारहाण करणाऱ्या तरुणाला जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपीने त्याच्याकडे असलेल्या कटरने डोंगरे यांच्या मानेवर वार करुन जखमी केले. तसेच मला असे पण जेलमध्येच जायचे आहे, असे म्हणून आरोपी तेथून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. डोंगरे यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.