Ravindra Dhangekar On Pune RTO Officers | आमदार धंगेकरांचा आरटीओ विभागाला इशारा; मनमानी सहन करणार नाही

0

पुणे: Ravindra Dhangekar On Pune RTO Officers | कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Accident) पोलिसांच्या कार्यपद्धतीला (Pune Police) घेऊन सुरुवातीपासूनच आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक पाहायला मिळाले. या प्रकरणाबाबत आमदार धंगेकर यांनी पोलीस आयुक्तालयात आंदोलनही (Dhangekar Protest At Pune CP Office) केले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागात जात अनाधिकृत पब, बार ची लिस्ट वाचत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. (Pubs In Pune)

१९ मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. यावेळी पोर्शे कारने अभियंता असलेल्या दोघांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. (Porsche Car Accident Pune)

ज्या गाडीने दोन तरुणांना उडवलं ती आलिशान पोर्शे कार होती. या कारला ना नंबर होता ना या कारचं रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. तरीही ही कार पुण्याच्या रस्त्यांवर बेफाम धावत होती. या कारच्या वेगाने आणि बिल्डर पुत्राच्या हुल्लडबाजीने दोघांचा जीव घेतला. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांवरदेखील टीका करण्यात आली.

आता आमदार धंगेकर यांनी ट्विट करत आरटीओ विभागाला इशारा दिला आहे. ” तो अगरवाल तीन महिन्यांपासून बिगर पासींगची गाडी चालवत होता, अन आरटीओ रिक्षावाल्यांना पासिंग उशिरा झाली तर दिवसाला ५० रुपये दंड ठोकतोय. रिक्षावाल्यांना ३०-३० हजार रुपये भरण्याच्या नोटीस आल्या आहेत. हा रवि धंगेकर गोर गरीब रिक्षावाल्याच्या पाठीशी उभा आहे. जो न्याय श्रीमंताला तोच गरिबाला आरटीओ ची मनमानी सहन करणार नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.