Dr Vinayak Kale | ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना पत्रकार परिषदेत मंत्र्यांचे नाव घेणे भोवले

0

पुणे: Dr Vinayak Kale | कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Accident) पुणे शहर गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार (Blood Sample Tampering) केल्याप्रकरणी अटक केली. या प्रकरणाबाबत चौकशी करण्यासाठी एसआयटी समिती निर्माण केली.

या एसआयटी समितीत जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे (Dr Pallavi Saple), डॉक्टर गजानन चव्हाण (Dr Gajanan Chavan), छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर सुधीर चौधरी (Dr Sudhir Chowdhury) यांचा समावेश आहे. डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वात या एसआयटी समितीने काम करत काही तासातच डॉ. अजय तावरेंवर कारवाई केली आहे.

रक्त तपासणी अहवालात फेरफार प्रकरणी तयार करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवातकर यांना सादर केला.

हरनोळ आणि शिपाई घटकांबळे यांना निलंबित करण्यात आले असून डॉ. तावरेंकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी कारवाई संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, डॉ. अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभागप्रमुख चार्ज काढून घेण्यात आला असून विजय जाधव यांच्याकडे तो चार्ज देण्यात आला आहे.

डॉ. विनायक काळेंनी पत्रकार परिषद घेत प्रकरणासंदर्भात आणि तावरे यांच्या नियुक्तीसंदर्भात माहिती दिली. हीच पत्रकार परिषद आता विनायक तावरेंना चांगलीच भोवल्याचे दिसत आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी हसन मुश्रीफांचे नाव घेतले आणि त्यांच्यावर कारवाई करत संध्याकाळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. डॉ. तावरे यांच्या नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिल्याने त्यावरूनही चांगलेच राजकारण झाल्याचे पाहायला मिळाले.

या संपूर्ण प्रकरणात ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना विविध प्रश्न विचारले जात होते. त्यानंतर डॉ. विनायक काळे यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी विनायक काळेंनी मी तावरेंची नियुक्ती केली नाही. मंत्र्यांनी निर्णय दिला, असे त्यांनी सांगितले. यावेळी मी नाही पण हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) त्यांची नियुक्ती केली, असे ते म्हणाले. त्यानंतर संध्याकाळी लगेच मुश्रीफांनी कारवाई केली आणि थेट विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.