Wanwadi Pune Crime News | पुणे : ‘बडी भाई के खिलाफ गये तो…’. तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण, पाच जणांवर FIR

0

पुणे : – Wanwadi Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घरात घुसून लाकडी बांबूने बेदम मारहाण (Bedum Marhan) करुन जखमी केले. तसेच ‘बडी भाई के खिलाफ गए तो किसीको भी नही छोडेंगे याद रखना’ अशी धमकी दिली. हा प्रकार 5 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वानवडी परिसरातील बोराडे नगर (Borade Nagar Wanowrie) येथे घडला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मुस्तफा अकिल शेख (वय-29 रा. कोंढवा, पुणे) याने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन परवेझ शेख उर्फ बडी याच्यासह इतर चार जणांवर आयपीसी 324, 323, 141, 143, 504, 506(2), 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या चुलत भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन चुलत भावाच्या घरात हातात लाकडी दांडके, पट्ट्या घेऊन आले.

आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हातातील बांबूने मारहाण करुन जखमी केले. मुस्तफा शेख याने आरोपींच्या ताडवडीतून सुटून पळून गेले असता आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. फिर्यादी त्यांच्या चुलत भावाच्या घरात गेले असता आरोपींनी चुलत भावाच्या घरावर दगडफेक करुन नुकसान केले. तसेच ‘बडी भाई के खिलाफ गए ना, तो किसीको भी नही छोडेंगे, याद रखना’ अशी धमकी देऊन पसार झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.