Hinjewadi Pune Crime News | पिंपरी : घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, पावणे पाच लाखांचा मुद्दमाल जप्त (Video)

0

पिंपरी : – Hinjewadi Pune Crime News | पिंपरी चिंचवड शहर (Pimpri Chinchwad) व परिसरात घरफोडी करणाऱ्या (House Burglary) दोन अट्टल चोरट्यांच्या हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) मुसक्या आवळल्या आहेत (Arrest In House Burglary) . त्यांच्याकडून सोने व चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई हिंजवडी परिसरात करण्यात आली.

दयामान्ना यल्लाप्पा शिवपुरे (वय 42, रा. देहूरोड), दुर्गाप्पा श्रीक्रिष्णा श्रीराम (वय 45, रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अभिजीत गोकुळदास मारवाडी (वय-38 रा. कस्पटे वस्ती) यांनी 23 मे रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी फिर्यादी मारवाडी यांच्या घरात घरफोडी झाली होती. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षर राम गोमारे यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी निष्पन्न करुन पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी कस्पटे वस्ती येथे घरफोडी केल्याचे कबूल केले. त्यांची पोलीस कस्टडी घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गुन्ह्यातील चोरले सोन्याचे दागिने काढून दिले. आरोपींकडून चार लाख 80 हजार रुपये किमतीचे 10 तोळे 6 ग्रॅम सोने व चांदीचे दागिने जप्त करून हिंजवडी पोलीस ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपी दयामान्ना शिवपुरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर देहुरोड, चतु:श्रृंगी, हिंजवडी, निगडी, पिंपरी, वाकड, कोथरुड, सांगवी, विजापुर नाका सोलापूर पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडी चोरीचे 12 गुन्हे दाखल आहेत. तर दुर्गाप्पा श्रीराम याच्यावर एमआयडीसी, विजापुर नाका सोलापूर, सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशार हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषिकेश घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.