Pune Pimpri Chinchwad Crime News | 124 ग्राहकांची 11 कोटी 22 लाखांची फसवणूक, 3 बड्या बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल

Cheating Fraud Case
29th May 2024

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | वडमुखवाडी (Wadmukhwadi) येथील अतुल्य रघुकुल (Calyx Atulya Raghukul) या गृहनिर्माण प्रकल्पात 124 सदनिका धारकांची सुमारे 11 कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी तीन बांधकाम व्यावसायिकांवर (Builders In Pune-Pimpri Chinchwad) मंगळावारी (दि.28) मोफा (MOFA Act) कायद्यांतर्गत (Maharashtra Ownership of Flats Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2018 ते 28 मे 2024 या कालावधीत घडला आहे.

याबाबत सिद्धेश्वर शंकर सिनलकर (वय-45 रा. कोतवाल नगर, काळजेवाडी, चऱ्होली, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून अतुल्य रघुकुलचे प्रवर्तक व विकसक कॅलेक्स ग्रुप ऑफ कंपनीज चे (Calyx Group of Companies) भागिदार गौरव सुनील सोमाणी Gaurav Sunil Somani (रा. बालाजी सोसायटी, बिबवेवाडी, पुणे), नितीन श्रीकिसन जाजू Nitin Srikisan Jaju (रा. पुणे), शाम लढ्ढा (Sham Laddha) यांच्यावर आयपीसी 406, 409, 420, 24 सह मोफा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅलेक्स लेनोरा या कंपनीकडून ऑक्टोबर 2018 मध्ये वडमुखवाडी येथील अतुल्य रघुकूल या गृहनिर्माण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या गृहप्रकल्पामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्याचे विकसकांनी जाहीर केले होते. त्यामुळे परिसरातील अनेक मध्यमवर्गीय लोकांनी या प्रकल्पात सदनिकेची नोंदणी केली होती. हा गृहनिर्माण प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचे आश्वासन विकसकांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्ष प्रकल्पावर बांधकाम पूर्ण करुन सदनिकांचा ताबा दिला नाही. तसेच आजपर्यंत अॅग्रीमेन्टनुसार कोणत्याही सुख-सुविधा दिल्या नाहीत. आरोपींनी फिर्यादी यांची 10 लाख 90 हजार 105 रुपयांची फसवणूक केली. तर 124 सदनिका धारकांची 11 कोटी 22 लाख 3 हजार 516 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.