Ajit Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार प्रकरणात CP ना फोन केला? अंजली दमानियांच्या आरोपानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या!

0

पुणे : Ajit Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावरून आता संपूर्ण राज्यात हादरे बसू लागले आहेत. या प्रकरणात दोन मोठे खुलासे झाले आहेत. अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याने ससूनच्या दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आरोप केला आहे की, या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का. जर केला असेल तर मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेतील का. दमानियांच्या या आरोपानंतर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी म्हटले की, मी कधीच कोणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही. मला एखाद्या प्रकरणात फोन करायचा असेल तर मी पोलीस पोलीस आयुक्तांना करेन (Pune CP), ग्रामीणचा विषय असल्याने ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांना (Pune Rural SP) करेन.

अजित पवार म्हणाले, पत्रकार मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले, मीही सांगितले. याप्रकरणी कुठलाही दबाव नाही, कुणीही पळवाट काढता कामा नये, जो कुणी दोषी असेल त्याला शासन झाले पाहिजे. मी दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या.

जेव्हा आम्ही विरोधी पक्षात असतो तेव्हा आम्ही म्हणतो राजकीय दबाव आहे. जेव्हा ते विरोधी पक्षात आहेत, तेव्हा तेही म्हणतात राजकीय दबाव आहे, ही बोलण्याची पद्धत आहे, असे म्हणत अजित पवार यांनी अंजली दमानिया यांचा आरोप फेटाळून लावला.

तर धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलीस आयुक्तांवर केलेल्या आरोपाबाबत अजित पवार म्हणाले, एका लोकप्रतिनीधीने थेट पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप केला. एका जबाबदार व्यक्तीने, काही लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीने सीपींवर आरोप करताना पुरावा तर दिला पाहिजे, नुसता आरोप करण्यात अर्थ नाही, असे अजित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.