Pimpri Accident News | पिंपरी : भरधाव दुचाकीच्या धडकेत वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी

0

पिंपरी : – Pimpri Accident News | भरधाव वेगात ट्रिपल शीट जाणाऱ्या दुचाकीची वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धडक बसली. यामध्ये हिंजवडी वाहतूक शाखेत (Hinjewadi Traffic Division) कार्य़रत असणारे पोलीस शिपाई जखमी झाले आहेत. हा प्रकार रविवारी (दि.19) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथील टाटा टी जंक्शन चौकात घडला आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जखमी पोलीस शिपाई सखाराम पोले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरनब उत्तमदे (वय-26 रा. नेरे दत्तवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 128(1)/194 (सी), 3(1)/181, 184, 132(1)/ 179 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोले हे हिंजवडी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. रविवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पोले हिंजवडी येथील टाटा टी जंक्शन चौकात आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी आरोपी जावा-42 (एमएच 14 एल.के. 5322) या दुचाकीवर तिघांना बसवून भरधाव वेगात आला. यावेळी पोटे यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र आरोपीने त्याकडे दुर्लक्ष करुन थेट पोलीस शिपाई पोले यांना धडक दिली. यात पोटे हे जखमी झाले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहेत.

कापड व्यावसायिकाला मारहाण

हिंजवडी : दुकानात काम करणाऱ्या मुलीला लवकर सोडत नाही तसेच सुट्टी देत नसल्याच्या कारणावरून दोघांनी कापड व्यावसायिकाला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन हातातील कड्याने डोक्यात व नाकावर मारुन जखमी केले. हा प्रकार बावधन येथे शनिवारी (दि.18) रात्री साडे सात वाजता गो कलर्स नावाच्या दुकानासमोर घडला.

याबाबत अक्षय सुनीलराव सोळंखे (वय-28 रा. वारजे माळवाडी, मुळ रा. अमरावती) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अमय नागपुरे व त्याच्या साथीदावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.