Monsoon Rains | मोसमी पाऊस कर्नाटक सह आंध्र प्रदेशात दाखल; दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे: Monsoon Rains | केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता सध्या मान्सून कर्नाटक या राज्यामध्ये दाखल झाला असून तेथे नैऋत्य मान्सून पावसामुळे कर्नाटकची राजधानी बेंगळूरू या शहराला अतिशय जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता हवामान विभागाने (India Meteorological Department – IMD) वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये दिनांक ५ जून व ७ जून या कालावधीमध्ये अतिशय मुसळधार व विजा सह जोरदार पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये ३० मे रोजी दाखल झालेला पाऊस शनिवारपर्यंत (१ जून) केरळमध्येच स्थिरावला होता.
रविवारी मोसमी वाऱ्यांनी केरळ, तमिळनाडू व्यापून पुढे दक्षिण कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेश, त्रिपुरातील काही भाग वगळता संपूर्ण ईशान्य भारत, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आगेकूच केली.
मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून, पुढील दोन-तीन दिवसांत मोसमी पाऊस उर्वरीत कर्नाटक व्यापून आणखी पुढे वाटचाल करेल, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मोसमी पाऊस रविवारी (२ जून) कर्नाटक, आंध्र प्रदेशात दाखल झाला. पावसाने केरळ, तमिळनाडू पूर्णपणे व्यापले असून, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतातही मोसमी पावसाची आगेकूच सुरू आहे.