Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : गावात अफवा पसरवल्याच्या कारणावरुन तरुणाला बेदम मारहाण, 6 जणांवर FIR

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | गावात मुली बाबात वेगळी चर्चा करुन अफवा पसरवल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका युवकाला लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली (Marhan) . तसेच जेल मधून बाहेर आल्यानंतर तुला संपवून टाकतो अशी धमकी दिली. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी (Alandi Police Station) सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 16 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ (Markal Khed) गावात घडला.

याप्रकरणी स्वप्निल किसन भुसे (वय 32, रा. मरकळ, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय नवनाथ लोखंडे, अमित नवनाथ लोखंडे, पंकज भाऊसाहेब साळुंखे, अविनाश बाळासाहेब लोखंडे, गौतम लालचंद्र लोखंडे, प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (सर्व रा. मरकळ, ता. खेड) यांच्या विरोधात आयपीसी 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ गावातील पाण्याच्या टाकीजवळ चहा पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी आरोपी अक्षय लोखंडे त्याठिकाणी आला. त्याने ‘तू माझी गावात मुली बाबत वेगळी चर्चा करून अफवा पसरवतो’ असे म्हटले. त्यावर स्वप्निल यांनी ‘मी तुझी कोणतीही चर्चा करून अफवा पसरवली नाही’ असे सांगितले.

त्यावेळी अक्षय याने शिवीगाळ करुन त्याठिकाणी वाळलेली नारळाची फांदी फिर्यादी यांच्या डोक्यात मारली. त्यानंतर अक्षय हा तिथून निघून गेला. काही वेळाने तो इतर आरोपींसह तिथे आला. आरोपींनी ह्याला लय माज आलाय असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करुन लाकडी दांडक्याने स्वप्निल यांना बेदम मारहाण केली. तसेच आम्ही जेलमध्ये जाऊन परत आल्यावर तुझ्याकडे बघू. तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.