Pune Crime News | पुणे : भरदिवसा सोन्याचं दुकान लुटणारी टोळी 12 तासात गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई (Video)

0

पुणे : – Pune Crime News | पुण्यात भर दिवसा वानवडी हद्दीतील वाडकर मळ्याशेजारी (Wadkar Mala in Wanwadi) असलेल्या बीजेएस ज्वेलर्सच्या ( BGS Jewelers Wanwadi Pune) दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला (Robbery In Jewelers Shop). ही घटना शनिवारी (दि.18) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली होती. हा दरोडा सात जण मिळून. चोरट्यांनी दुकानातील व्यक्तीला पिस्टल व इतर शस्त्रांचा धाक दाखवून 300 ग्रॅम सोन्याचे तयार दागिने चोरुन नेले होते (Arrest In Robbery). दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेची (Pune Crime Branch) 10 पथके रवाना करण्यात आली होती. या पथकांनी आरोपींचा शोध घेऊन 12 तासात अटक करुन 48 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी शफीउद्दीन गियासुद्दीन शेख (वय-23 रा. नानापेठ, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन चोरट्यांवर आयपीसी 395, 397, 398 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सनी उर्फ योगेश हिरामण पवळे (वय-20 रा. वसंतनगर, पौड रोड, कोथरुड), सनी उर्फ आदित्य राजु गाडे (वय-19), पियुष कल्पेश केदारी (वय-18 रा. येरवडा), ओमकार उर्फ ओम्या जगन वाल्हेकर (वय-19 रा. जयभवानी नगर, कोथरुड), नारायण उर्फ नारु बाळु गवळी (वय-20 रा. टिळेकर नगर, कात्रज), मयुर चुन्नीलाल पटेल (वय-53 रा. वानवडी), नासिर मेहमुद शेख (वय-32 रा. चांभारवाडा, वानवडी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरोड्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडील 4, 5, 6, खंडणी विरोधी पथक 1 व 2, दरोडा व वाहन चोरी पथक 2 कडील अधिकारी व अंमलदार यांची 10 पथके तयार करुन समांतर तपास सुरु केला. पथकाने तपास करत असताना मिळालेल्या माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी इतर तीन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून 601.15 ग्रॅम वजनाचे सोने, 2 दुचाकी, 1 चारचाकी व 6 मोबाईल असा एकूण 48 लाख 30 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेल्या आरोपींपैकी सनी उर्फ योगेश पवळे याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर सनी उर्फ आदित्य गाडे याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) खुनाचा व कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) चोरीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय मयुर पटेल याच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) खुनाचा गुन्हा (Attempt To Murder) दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 सतीश गोवेकर, सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे, उल्हास कदम, क्रांतीकुमार पाटील यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे शिवदास लहाने, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, श्रीकांत चव्हाण, यशवंत ओंबासे, पोलीस अंमलदार अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, मयुर भोकरे, सयाजी चव्हा, अशोक शेलार, अमोल सरतापे, चेतन शिरोळकर, राहूल इंगळे, विनायक येवले, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, दिलीप गोरे, खरात, पवण भोसले, विनोद शिवले, अश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, दाऊद सय्यद, माऊली गिरमकर, सुदेश संपकाळ, सुरेश जाधव, शिरीष गोसावी, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, राहूल ढमढेरे, अकबर शेख, प्रविण ढमाळ, शहाजी काळे, रविंद्र फुलपगारे, अमर पवार यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.