Devendra Fadnavis Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : देवेंद्र फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन, बिल्डर पुत्रावर कठोर कारवाईचे आदेश

0

पुणे : – Devendra Fadnavis Kalyani Nagar Pune Accident | पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिकाच्या (Builder In Pune) मुलाने दोन आयटी अभियंत्यांना आपल्या आलिशान गाडीखाली चिरडले (Two IT Engineer Death). मात्र, अपघातानंतर आरोपीला काही तासात जामीन मिळाला. आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पुण्यात रात्री-अपरात्री, उशीरापीर्यंत सुरु असलेल्या बार आणि धनाड्य बापाच्या मुलाचा बेदरकारपणा आज दोघांच्या जिवावर बेतला (Pubs In Pune). या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना (Pune Police) दिले आहेत.

या अपघातानंतर स्थानिकांनी विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Builder) यांच्या मुलाला पोर्शे गाडीतून बाहेर काढून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, त्यानंतर या धनिकपुत्र अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला. याबद्दल नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश दिले आहेत. फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना (Pune CP) फोन करुन आदेश दिले. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तर सीसीटीव्ही तपासा

पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून (CCTV Footage) ते खरे असेल तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.