PM Modi Sabha In Mumbai | पंतप्रधान मोदींची आज मुंबईत प्रचारसभा! राज ठाकरेंची व्यासपीठावर उपस्थिती, 14 तासांसाठी वाहतुकीत मोठे बदल

0

मुंबई : PM Modi Sabha In Mumbai | दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील घाटकोपर (PM Modi Road Show Ghatkopar Mumbai) येथे रोड शो झाला होता. यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे मुंबईतील मेट्रो स्टेशन (Mumbai Metro Station), रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी झाली होती. यामुळे मुंबईकर त्रस्त झाले होते. अनेकांनी आपला हा संताप सोशल मीडियावर व्यक्त केला होता. आज पुन्हा मुंबईतील शिवाजीपार्कवर (Shivaji Park Mumbai) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून मुंबईतील काही रस्ते तब्बल १४ तासांसाठी बंद करण्यात आले आहेत.

आज १७ मे रोजी मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा होणार आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील उपस्थित राहणार असल्याने ही सभा चर्चेत आहे. या सभेसाठी पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. दादरमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. तर काही रस्ते बंद केले आहेत.

या सभेमुळे अनेक रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच काही रस्ते बंद करण्यात आल्यामुळे पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. पर्यायी मार्ग दांडेकर चौकात पांडुरंग नाईक मार्गे डावीकडे वळून राजबाधे चौकात उजवीकडे वळा. जे. गोखले रोड किंवा रस्त्याने एन. सी. केळकर रोडचा वापर करावा, असे वाहतुक पोलिसांनी सांगितले आहे.

शिवाजी पार्कच्या सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे प्रथमच एका मंचावर येत आहेत. महाराष्ट्रात पाचव्या आणि अंतिम टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघात येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. या प्रचाराची सांगता शनिवारी होईल. मोदींच्या उपस्थितीत मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.