पुस्तक हा श्‍वासाचा भाग व्हावा

साहित्यिक प्रविण दवणे

0

पुणे : एन पी न्यूज 24 – वाणिज्य, विज्ञान, कला या ज्ञान शाखांमुळे लौकिक जगात जगण्याचे शिक्षण मिळते. अलौकिक जग साध्य करण्यासाठी वाडमयाची गरज असते. त्यासाठी पुस्तक हा श्‍वासाचा भाग व्हावा अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत साहित्यिक प्रविण दवणे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना श्री. दवणे विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. आशीष पुराणीक, व्ही. व्ही. घाणेकर, संजय साळवे, प्रशांत साठे व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. दवणे पुढे म्हणाले, ‘ त्याला मन, स्पंदन, श्‍वास अशी जीवंतपणाची लक्षणे पुस्तकात असतात. उद्याची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य पुस्तकांमध्ये असते. पुस्तक वाचनाने मनाचे पोषण होते. वाचनामुळे भविष्यातील कल्पना वर्तमानात कळतात. त्यामुळे भविष्य सुकर होते. म्हणून वाचनाचे महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी वाचनात गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न आावश्यक आहेत.’ प्रदर्शनात विविध विषयांची व प्रकाशनांची पाच हजारहून अधिक पुस्तके मांडण्यात आली आहेत. उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. प्रदर्शनाचे हे चोविसावे वर्ष आहे.

visit : http://npnews24.com