Hoarding Collapse In Moshi Pimpri Chinchwad | पिंपरी : मोशी होर्डिंग प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर, दोघांवर गुन्हा दाखल (Videos)

0

पिंपरी : – Hoarding Collapse In Moshi Pimpri Chinchwad | मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून (Hoarding Collapse In Mumbai Ghatkopar) मोठी दुर्घटना घडल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना गुरुवारी (दि.16) घडली आहे. या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोसळलेल्या होर्डिंगचा मजबुतीकरणाचा दाखल्याची (स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) मुदत संपली होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मजबुतीकरणाची मुदत संपली असताना देखील यावर महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ग्यानचंद हरी भट (वय-55 रा. स्टेशन रोड, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार होर्डींगचे परवाना धारक आनंद ॲडव्हर्टायझिंगचे स्ट्रक्चर डिझायनर आनंद रमणलाल गांधी Anand Ramanlal Ghandhi (वय-38 रा. महर्षीनगर, पुणे) व हेमंत कुमार शिंदे Hemant Kumar Shinde (रा. फालेनगर, कात्रज) यांच्यावर आयपीसी 336, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

स्पाईन रोड मोशी (Spine Road Moshi) येथील जयगणेश साम्राज्य चौकातील (jai ganesh samrajya chowk) २० बाय ४० फुट आकाराचे होर्डींग गुरुवारी पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले. यामध्ये टेम्पो, कार, पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आरोपींनी मजबुतीकरणाचा दाखल्याची मुदत संपली असताना ती मुदतीत नुतनीकरण केले नाही. तसेच मानवीजिवीत व इतरांच्या व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे बेदरकारपणे व हयगयीने कृती केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष हाके करीत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर शहरातील सर्व होर्डिंग्जबाबत संबंधितांची बैठक शुक्रवारी (दि. १७) आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत होणार आहे. तसेच शहरातील सर्व होर्डींग चे स्ट्रक्चरल ॲाडीट करण्यात येत आहे. मोशी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर या घटनेची आयुक्त शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेवून सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर व उपायुक्त संदीप खोत यांना घटनास्थळ पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.

शहरातील अनधिकृत होर्डींगचे सर्वेक्षण सुरू असून सोमवार पासून त्यावर कारवाईची मोहिम सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.