Sharad Pawar Slams Praful Patel | शिवरायांचा जिरेटोप घालून मोदींचा सत्कार, शरद पवारांनी प्रफुल पटेलांना फटकारले, लाचारी करावी, पण त्यालाही मर्यादा असते

0

मुंबई : Sharad Pawar Slams Praful Patel | जिरेटोप (Jire Top Pagadi) आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांसाठी (Chhatrapati Shivaji Maharaj) ओळखला जातो. लाचारी असते, नाही असे नाही, पण लाचारीला काही मर्यादा असते, त्या सगळ्या मर्यादा या लोकांनी सोडल्या आहेत. एक चांगले झाले की त्यांनी सांगितले की पुन्हा आम्ही काळजी घेऊ, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेलांना फटकारले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

वाराणसीला लोकसभेचा (Varanasi Lok Sabha ) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रफुल पटेलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालून सत्कार केला. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा संताप पाहून पटेल यांनी यापुढे काळजी घेऊ, असे म्हटले असले तरी निषेध, टीका सुरूच आहे.

दरम्यान, आज यावरूनच शरद पवार यांनी पटेलांना सुनावले. शरद पवार म्हणाले, महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचे काम हे नेते करत आहेत. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही.

दरम्यान, शिवप्रेमींचा संताप पाहून पटेलांनी माघार घेतली आहे. त्यांनी म्हटले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ.

Leave A Reply

Your email address will not be published.