Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : गुन्हे शाखेची मोठी करवाई, गहाळ झालेले वेगवेगळ्या कंपनीचे 70 स्मार्ट फोन शोधले (Video)

पिंपरी : – Pimpri Chinchwad Crime Branch | हातात जग सामावून घेणारी वस्तू म्हणजे मोबाईल, मात्र, अत्यावशक झालेला मोबाईल कुठे हरवला तर त्या व्यक्तीची सर्वच कामे ठप्प होतात. मोबाईल हरवल्याच्या तक्रारी (Mobile Missing Complaint) पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील अनेक पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. परिणामी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने तब्बल 10 लाख 14 हजार 700 रुपयांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे 70 स्मार्ट मोबाईल फोन शोधून काढले असून लवकरच मूळ मालकांना परत केले जाणार आहेत. (Pimpri Chinchwad Police)

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सन 2023 तेम मार्च 2024 या कालावधीत अनेक मोबाइल फोन गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याबाबत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना हरवलेले मोबाईल फोनचा शोध घेऊन हस्तगत करण्याकरीता विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आलेहोते. पथकाने हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारींची माहिती एकत्रित केली. पोलीस अंमलदार प्रविण कांबळे यांनी हरवलेल्या मोबाईलचे तांत्रिक दृष्ट्या तपास करुन गहाळ झालेले जे मोबाईल अॅक्टीव्ह झाले आहेत त्यांची माहिती जमा केली. (Mobile Theft Case)

त्यानंतर दरोडा विरोधी पथकातील अंमलदार यांना अॅक्टिव्ह झालेल्या मोबाईल क्रमांक नाव व पत्ते देण्यात आले. पथकाने अॅक्टिव्ह झालेले 10 लाख 14 हजार 700 रुपयांचे 70 स्मार्ट फोन अमरावती, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, बीड, जालना, औरंगाबाद, धाराशिव, सोलापूर इत्यादी जिल्ह्यातून हस्तगत केले. हस्तगत केलेले मोबाईल मुळ मालकांना लवकरच परत केले जाणार आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार प्रवीण कांबळे, महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण माने, सागर शेडगे, गणेश कोकणे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली.