Kothrud Pune Crime News | पुणे : सराईत चोरट्याला कोथरुड पोलिसांकडून अटक, लॅपटॉपसह 3 दुचाकी जप्त

0

पुणे : – Kothrud Pune Crime News | उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करुन लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Record) कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून लॅपटॉपसह तीन दुचाकी असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमित सुभाष मोरे (वय-31 रा. विश्वशांती चौक, काळेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोथरुड येथील धनलक्ष्मी सोसायटीतील (Dhanlaxmi Society Kothrud) फ्लॅटच्या उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन 38 हजार 500 रुपये किमतीचा लॅपटॉप, मोबाईल व अॅपनर चोरुन नेल्याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 मे रोजी सकाळी साडे दहा ते पावणे अकरा या कालावधीत घडला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी चोरी अमित मोरे याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मुद्देमालासह तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीकडून कोथरुड आणि पौड रोड पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रमसिंग कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी बालाजी सानप, पोलीस अंमलदार अजिनाथ चौधर, विशाल चौगुले, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, आकाश वाल्मिकी, संजय दहिभाते, शरद राऊत, विष्णु राठोड, अजय शिर्के, मंगेश शेळके यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.